Sunday, 12 June 2011

आयुष्य खूप सुंदर आहे ......Aayushy Khup Sundar Aahe ... - कवी कुसुमाग्रज

आयुष्य खूप सुंदर आहे 
आयुष्य खूप सुंदर आहे, 
सोबत कुणी नसलं तरी, 
एकट्यानेच ते फुलवत रहा, 
वादळात सगळ वाहून गेल, 
म्हणून रडत बसू नका, 
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका 
मृगाकडे कस्तुरी आहे, 
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे, 
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका, 
अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे| 
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!!मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितीज घेऊन| 
अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून 
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ, 
उत्साह ध्येयाने भारून म्हणून म्हणते..... 
आयुष्य खूप सुंदर आहे, 
सोबत कुणी नसलं तरी, 
एकट्यानेच ते फुलवत रहा..........................................

                                                           - कवी कुसुमाग्रज  


1 comment:

  1. ही कविता कोणत्या संग्रहातील आहे. प्लीज

    ReplyDelete