Saturday, 30 April 2011

आपल्या काळात .......

आपल्या काळात इमारतींची उंची वाढली 
पण माणुसकीची कमी झाली का ? 
रस्ते रुंद झाले; पण दृष्टी अरुंद झाली का? 
खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली 
घरं मोठी पण कुटुंबं छोटी ......
सुखसोयी पुष्कळ; पण वेळ दुर्मिळ झाला.
पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग 
माहितीचे डोंगर जमले; पण नेमकेपणाचे झरे आटले. 
तज्ज्ञ औषधे भरपूर; पण आरोग्य कमी झाले.   
मालकीची भाषा वाढली, मुल्यांची कमी 
आपण बोलतो फार......प्रेम क्वचित करतो......आणि तिरस्कार सहज करतो......
राहणीमान उंचावले; पण जगण दर्भद्री झाले.
आपल्या जगण्यात वर्षाची भर पडली; पण आपल्या वर्षामध्ये जगण्याची नाही 
आपण भले चंद्रावर गेलो-आलो; पण शेजारच्या नव्या माणसाला भेटण काही होत नाही.
बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत; पण आतल्या हरण्याचं काय ? 
हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा; पण आत्म्याच्या गूदमरण्याचं काय? 
आपली आवक वाढली; पण नियत कमी झाली 
संख्या वाढली - गुणवत्ता घसरली. 
हा काळ उंच माणसांचा; पण खुज्या व्यक्तिमत्वांचा
उदंड फायद्यांचा; पण उथळ नात्यांचा. 
जागतिक शांतीच्या गप्पांचा पण घरातल्या युद्धांचा 
मोकळा वेळ हाताशी; पण त्यातली गंमत गेलेली. 
विविध खाद्यप्रकार; पण त्यात सत्व काही नाही 
दोन मिळवती माणसं; पण त्यांचे घटस्फोट वाढलेले. 
घरं नटली; पण घरकुलं दुभंगली 
दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेलं; पण कोठीची खोली रिकामीच. 
हे पत्र तुमच्यापर्यंत पोचवणारं तंत्रज्ञान आज आहे 
आणि आज आहे तुमचं स्वातंत्र्यही......
ह्या पत्राकडे लक्ष देण्याचं किंवा न देण्याचं
यातलं काही वाटलं तर बदला.....
किंवा ......विसरून जा......


                                                                       मूळ लेखक : दलाई लामा 
                                                                       अनुवाद      : शोभा भागवत 


(The Above One In English Is Just Below This Post)

No comments:

Post a Comment